शिंदखेडा लोकनियुक्त नगराध्यपदी भाजपाच्या रजनी वानखेडे विजयी

0

नगरसेवकपदाच्या 17 जागांपैकी 10 जागांवरही भाजपाचे वर्चस्व

शिंदखेडा । येथील नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपाच्या रजनी वानखेडे या 3 हजार 233 मताधिक्याने विजयी झाल्या. नगरसेवकपदाच्या 17 जागांपैकी 10 जागाही काबीज केल्या. तर कॉँग्रेसला पाच व समाजवादी पक्षाला दोन जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान शिवसेना व मनसेला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. शिंदखेडा नगरपंचायतीसाठी बुधवारी 72 टक्के मतदान झाले. गुरूवारी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरवात झाली. यात लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपाच्या रजनी वानखेडे विजयी झाल्या. त्यांनी कॉँग्रेसच्या मालती देशमुख यांचा 3 हजार 233 मताधिक्याने पराभव केला. तसेच नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने 10 जागा मिळविल्या. कॉँग्रेसला 5, व समाजवादी पक्षाला 2 जागा मिळाल्या.

अवघ्या 40 मिनिटात निकाल
सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू झाली. त्यात तीन फेजया अखेर अवघ्या 40 मिनीटात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होवून निकाल जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.