शिंदखेडा शहरात आता 15 दिवसात नव्हे तर 3 दिवसाआड पाणी येणार

0

शिंदखेडा । शहरात गेल्या 30 वर्षांपासून केवळ पाण्यावर राजकारण सुरू होते अनेकवेळा पाणी पुरवठा योजनेच्या नावाने बॅनर झळकले, फटाके फुटले पण ते फटाके केवळ फुसके होते मी शहराचा पाणीप्रश्‍न सोडविण्याचे वचन दिले होते ते आज पूर्ण केल्याचे समाधान आहे, आज पासून शिंदखेडा शहराला 15 नव्हे तर केवळ 3 दिवसाआड पाणी येईल असा विश्‍वास राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या 21 कोटीच्या पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. योजनेचे जलपूजन ना.रावल यांच्या हस्ते करण्यात आले.

अनिल वानखेडे भाजपात
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जवळपास 4 ते 5 हजार शेतकर्‍यांना सिंचन विहिरी दिल्या आहेत. पाणी योजनेचे काम पूर्ण झाल्यावर दररोज किंवा एक दिवसाआड पाणी देण्याचा देखील प्रयत्न असल्याचे ना.रावल यांनी सांगितले. ना जयकुमार रावल यांनी यावेळी नमूद केले यावेळी कामराज निकम, अनिल वानखेडे, सुभाष माळी यांनीही आपले ममोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.प्रदीप दीक्षित यांनी केले. भाजपात प्रवेश केल्यानंतर ना.रावल यांच्या माध्यमातून पाणी प्रश्‍न सुटल्याने भाजपात प्रवेश केल्याचे समाधान वाटत असल्याचे अनिल वानखेडे यांनी सांगितले.

बुराई नदी सुशोभीकरण
आदिवासी मुलांकरिता वसतीगृह बांधले आहेत. याशिवाय आगामी काळात शिंदखेडा शहरातील बुराई नदीच्या सुशोभीकरणासाठी जवळपास 5 कोटींचा निधी मंजूर केला आहे. याशिवाय बुराई नदीला बारमाही करण्यासाठी 34 बंधारे मंजूर केले असून लवकरच त्या कामाला सुरुवात होणार आहे येत्या पावसाळ्यात बुराई नदीतून वाहून जाणारे पाणी आता अडविण्यात येणार आहे तसेच भाजीपाला मंडई यासाठी 63 लाख रुपये मंजूर असून लवकरच हे काम पुर्ण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यांची लाभली उपस्थिती
यावेळी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, नगराध्यक्षा रजनी वानखेडे, उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, कामराज निकम, अनिल वानखेडे, तहसीलदार सुदाम महाजन, मुख्याधिकारी अजित निकत, सुभाष माळी, युवराज माळी, भिला पाटील, वंदना गिरासे, योगिता पाटील, नर्मदा भिल, अशोक देसले, निर्मला माळी, नगरसेवक किसन सकट, भारती जाधव, राहुल कचवे, संगिता थोरात, मीरा पाटील, राजेंद्र देसले, किरण चौधरी, गोविंद मराठे, दीपक चौधरी, भूषण कौठळकर, अरुण देसले,निलेश पाटील, दीपक अहीरे, सुनील चौधरी, उदय देसले, सुरज देसले आदी मान्यवर उपस्थित होते.