शिंदखेडा। राज्याच्या मध्य भागात झालेल्या अवकाळी पावसाचे परीणाम शहरातही पाहावयास मिळाले. शहरात दूपारी चारवाजेनंतर अचानक ढगाळ वातावरण झाले. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामूळे उन्हाची तिव्रता कमी झाली. उन्हाच्या त्रासाने त्रस्त झालेल्या नागरीकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
मे महिन्यात वाळवणाचे सामान बनविण्याची महिलांची कामे सुरु आहेत. त्यात साठवलेले धान्य उन्हात वाळविणे, अंथरूण पांघरून स्वच्छ धूवून वाळविणे, घरातील साफसफाई करणे, ग्रामीण भागात अद्यापही शेवया व पापड तयार करण्यात महिला मग्न आहेत. अचानक वातावरणात झालेल्या बदलामूळे महिलांची देखील धावपळ झाली. शेतामध्ये खरीपाची कामे सुरू आहेत. अवकाळी पाऊस झाल्यास काही भागात लावलेल्या पिकांचे मोठे नूकसान होण्याची भिती शेतक-यांमध्ये दिसत होती.