शिंदखेडा । केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी संपर्क करून शिंदखेडा रेल्वे स्थानकावर जलद गाड्यानां थांबा लवकरात लवकर मिळवून देणार असल्याचा शब्द केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिल्याने संघर्ष समितीने पुकारलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले.तहसीलदार सुदाम महाजन ,रेल्वेचे अधिकारी राजकुमार यांनी समितीचे अध्यक्ष सलीमभाई नोमानी यांना शरबत दिले व त्यानंतर उपोषण शनिवारी मागे घेण्यात आले. पश्चिम रेल्वेच्या शिंदखेडा रेल्वे स्टेशनला लांब पल्याच्या गाड्या थांबवाव्यात या मागणीसाठीचे निवेदन जनरल मॅनेजर ए.के. गुप्ता यांना देवून व पाठपुरावा करून देखील अद्यापही रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने रेल्वे संघर्ष समिती तर्फे उपोषण सुरू होते.
रेल्वेमंत्र्यांशी केली चर्चा
या आंदोलनात संघर्ष समितीचे अध्यक्ष सलीम नोमानी, रवींद्र लखोटे, खुशालभाई ओसवाल, राजेंद्र पाटील,प्रेमराज मराठे, सदाशिव देसले, प्रा. प्रदीप दीक्षित, डा.संजय सोनगडकर, भाजपचे शहर अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, दादा मराठे, राजेंद्र मोरे, बाळासाहेब गिरासे, इत्यादींचा सहभाग होता. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनीरेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा करून लवकरच थांबा देण्याच्या मागणीला पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले.