शिंदखेडा । धुळे जिल्ह्यातील डॉ.सुभाष भामरे केंद्रात तर ना.जयकुमार रावल राज्यात मंत्री आहेत. या जोडगोळीने सातत्याने सुलवाडे-जामफळ कनोली योजनेच्या मंजूरीसाठी पाठपुरावा केला. या योजनेला राज्य शासनाने मंजूरी दिली येत्या काही दिवसात या योजनेच्या कामाला सुरूवात होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विकासाच्या या लाटेत नगरपंचायतीची सत्ता भाजपाच्या हाती द्या.विविध योजनेच्या माध्यमातून निधी देऊन शहराच्या विकासाची जबाबदारी घेतो, विकास झाला नाही तर आम्हाला बोला, असेही ते यावेळी म्हणाले. शिंदखेड्यात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी ,प्रा.अरविंद जाधव आदि उपस्थित होते.
सत्ता मिळण्याचा विश्वास
राज्यात भाजपा सरकारने शेतकरी कर्ज माफी, ई -गर्व्हनर, तसेच केंद्र सरकाच्या पंतप्रधान आवास योजनेअंर्तगत 2019 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याची योजना हाती घेतली आहे.भ ाजपा सरकारने राज्यात विकासाचे पर्व आणले आहे. ही परिवर्तनाची वेळ आहे. या काळात शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये भाजपालाच सत्ता मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
टॅक्स चोरी थांबविण्यासाठी सॅटेलाईल मॅपींग
वाढत चाललेल्या शहरीकरणामुळे शहर बकाल होत आहेत, घाणीचे साम्राज्य वाढत आहे, शहरीकरण हा अभिशाप न मानता केरकचरा व सांडपाण्याचं विलगीकरण करण्याचे आदेश नगर पंचायत , ग्रा.प.देवून त्यावर प्रक्रिया करून हरीत सिटी ब्रॅण्ड नावाने खत तयार करण्याचा प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे.त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यातून नगरपालिकांचे उत्पन्न वाढत आहे.त्यामूळे घनकच-याचे व्यवस्पनेसाठी व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाहि असे आश्वासन त्यांनी दिले. राज्यात भ्रष्टाचार कमी करणेसाठी ई गर्व्हरन हि योजना आणली, तसेच आगामी काळात टॅक्स चोरी थांबविण्यासाठी सॅटेलाईट मॅपिंग हि योजना आणणार असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसवर आरोप
गेल्या सत्तर वर्षाच्या काळात कॉग्रेस सरकारने निवडणूक आली की या देशातील व राज्यातील गोरगरीब जनतेला जवळ केले आणि सत्तेत आल्यावर गरीब जनतेला वा-यावर सोडून आपलाच विकास करायचा हे धोरण कॉग्रेसने राबविले आणि म्हणूनच या देशातील व राज्यातील जनतेने सत्ता भाजपाच्या हाती सोपविली.भाजपाने सत्तेत आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब जनतेसाठी पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटी शेतक-यांच्या उथ्थानासाठी विवीध योजना आखल्या आणि या योजनांचा लाभ लाभार्थ्या पर्यंत पोहचतो आहे.
शिंदखेड्याचा वनवास संपला
याप्रसंगी बोलतांना पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल म्हणाले, शिंदखेडा नगरपंचायत निर्मितीचे काम माझ्या राजकिय कारर्किदितील सर्वात मोठे काम, नगर पंचायत झाली आणि कायम स्वरूपी पाणी योजना हाती घेतली, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंजूरी दिली व शहरात एकविस कोटी रूपयांच्या पाणी योजनेच्या कामाला सुरूवात झाली. शिंदखेडेकरांचा तीस वर्षाचा वनवास संपल्याचे समाधान आहे.या निवडणूकीत शहरातील सर्व सामान्य उमेदवार घेवून भाजपा रिंगणात आहे.मतदार या भाजपाच्या उमेदवारांसोबत असून एकहाती सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परिस्थितांमध्ये गटनेते अनिल वानखेडे व नगराध्यक्ष पदांचे उमेदवार रजनी वानखेडे व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होत.