शिंदखेडा नगरपंचायतीच्या दूसर्या पंचवार्षिक निवडणूकीचे बिगुल वाजल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. विवीध राजकीय पक्षाच्या नेत्यांची ‘वेट अॅण्ड वॉच पॉलिसी‘ असली तरी इच्छूकांनी मात्र गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रथमच मतदारांमधून होणार असून ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छूक उमेदवार निराश झाले आहेत. इच्छूकांनी महिला उमेदवारांचे चेहरे मतदारांसमोर आणले आहेत. त्यासाठी सोशल मिडीयाचा आधार घेतांना दिसत आहेत. निवडणूकीपूर्वी विकासाच्या मुद्यावर एकत्र आलेले दोन्ही गट व गटनेते वेगळे झाल्याने बहुरंगी लढत प्रत्येक प्रभागात होणार हे निश्चित. या निवडणूकीत कोणता राजकिय पक्ष कोणाशी यूती करेल या विषयी तर्कविर्तक लावले जात आहेत.
सोशल मिडीयाचा वापर करून शिंदखेडा शहरातील प्रश्नांसाठी आम्हीच पाठपूरावा केला व सोडविले असेच चित्र इच्छूक उमेदवारांकडून मतदारांसमोर उभे केले जात आहे.प्रथमच शिंदखेडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाची निवड देखील जनतेतून होणार असल्याने खरी चूरस नगराध्यक्षपदासाठीच असेल. नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहिर झाल्याने राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी काय भुमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे. भाजपाने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहिर केला असून इतर राजकिय पक्षाच्या यूतीसाठी बैठका सुरू असून जागा वाटपाच्या बोलणीवरच कोणाशी यूती होते. याबाबत उत्सूकता आहे. शिंदखेडा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर होवून पाच वर्षाचा कालावधी होत आहेत. यावषार्ंत मतदारांनी राजकारणाबाबत असतील किंवा शहरात झालेल्या विकास कामांच्या बाबत असेल अनेक स्थित्यंतरे नागरीकांनी पाहिली आहेत. गेल्या निवडणूकीत माजी.प.स.समिती सभापती प्रा.सुरेश देसले, माजी सरपंच अनिल वानखेडे,यांच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत झाली होती.या दोन्ही नेत्यांच्या गटाला समसमान आठ जागा मिळाल्या होत्या.व अखेर शिवसेनेचे युवराज माळी यांची मदत घेत प्रा.देसले गटाने नगरपंचायतीवर सत्ता स्थापन केली.या निवडणूकीपूर्वी अनिल वानखेडे व त्यांच्या सर्मथकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि विकासाच्या मुद्यावर एकत्र आलेले वानखेडे गट व प्रा.सुरेश देसले गट वेगळे झाले आहेत. प्रा.सुरेश देसले हे कॉग्रेस सर्मथक आहेत. परंतू जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्याशी असलेले मतभेद सर्वश्रूत आहे. परंतू हे मतभेद बाजूला सारून काँग्रेस -राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये यूतीसाठी प्रयत्न होत असून ही यूती होण्याची दाट शक्यता आहे. नगराध्यक्षपदासाठी प्रा.सुरेश देसले सर्मथक काँग्रेसचा उमेदवार व उर्वरीत 17 जागांसाठी बारा-पाच ह्या फॉम्यूल्यावर हि यूती होणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची धूरा संदिप बेडसे यांच्याकडे होती तोपर्यंत शहरात पक्षाची हवा होती. परंतू त्यांनी या शहरासह मतदार संघाकडे पाठ फिरवल्याने पक्षाची ताकद कमी झाल्याचे चित्र आहे. यामूळे कॉग्रेस पक्षाला राष्ट्रवादीशी यूतीसाठी करून काय फायदा होईल हे येणारा काळच सांगेल. राष्ट्रवादीकडे इच्छूक उमेदवार अधिक असल्याने उमेदवारी देतांना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी इच्छूकांनी फिल्डिंग लावली आहे. पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढविण्याचे संकेत अनेक इच्छूकांनी दिले आहेत.आम्ही किती दिवस फक्त सतरंजी उचलायची असा प्रश्न इच्छूकांनी केल्याने तिकिट कोणाला द्यायचे या विषयी नेत्यांसमोर पेच आहे. शिंदखेडयाच्या राजकारणात विजयसिंग राजपूत उर्फ विजू बापू यांची भूमिका महत्वाची आहे. विजू बापूंच्या पाठिंब्याने अनिल वानखेडे यांनी तात्कालिन ग्रा.प.सत्ता मिळविली होती हे सर्वांनाच ज्ञात आहे.मात्र सद्यतस्थितीत गिरासे प्रा.सुरेश देसले सोबत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामूळे विजू बापू कोणत्या गटाला आपला पाठिंबा देतात यावर त्या गटाचे यश निवडणूकीत अवलंबून असेल.अनेक निवडणूकीत किंग मेकरची भूमिका विजयसिंग राजपूत यांची राहिली आहे.ती याहि निवडणूकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शिंदखेडा नगरपंचायत निवडणूकीत स्वतंत्र पॅनल देण्याची घोषणा शिवसेना नेत्यांनी केली आहे.सेनेची तालूक्यात ताकद आहे, मजबूत नेटवर्क आहे.सर्व सामान्यांसाठी धावून जाणारे कार्यकर्ते आहेत.राजकारणापेक्षा समाजकारण अधिक आहे , ह्या जरी सेनेच्या जमेच्या बाजू असल्या तरी शहरात सेनेचे कोणतेही विकासाचे काम दिसत नाहि.सेनेकडे पंचायत समितीचे सभापती व उपसभापतीपद दोन-दोन वेळेला असतांना सुध्दा कोणतीही भरीव कामे सेनेकडून शहरात झाली नाही.राज्यात सेनेची सत्ता असल्यावर देखील कोणतीही विकासाची कामे शहरात झालेली नाहित. सेनेचे जिल्ह्यातील नेते निवडणूका असल्या किंवा वरीष्ठ नेते तालूका दौ-यावर असतील त्याच वेळेला शिंदखेडयात दिसतात.अन्यथा तालूक्यातील पदाधिकारी जनतेच्या संर्पकात दिसतात. शहरामध्ये ज्यांच्या मुळे सेनेचा बोलबाला होता ते युवराज माळी यांनी देखील सेनेतून बाहेर पडून भाजपामध्ये प्रवेश केल्याने सेनेला या निवडणूकीत संघर्ष करावा लागणार आहे.परंतू शिवसेनेने संघर्षातून सत्ता मिळविली आहे हे इतरांनी विसरून चालणार नाहि.सेनेचे संपर्क प्रमुख खा.संजय राऊत यांचा झंझावती दौरा शहरात झाल्याने शिवसेनेची दखल इतर पक्षांनी घ्यावी असे वातावरण सेना निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. त्यामूळे या निवडणूकीत बहूरंगी लढत होणार आहे.
– प्रा.अजर बोरदे, शिंदखेडा
9011314139