शिंदखेड्यात भाजपातर्फे जिवनावश्यक वस्तुंचे वाटप

0

शिंदखेडा। शहरात कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले आहे.याकाळात कुठलेच कुटुंब अन्नाशिवाय उपाशी झोपु नये, यासाठी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या सूचनेनुसार शिंदखेडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रजनी वानखेडे, गटनेते अनिल वानखेडे आणि भाजपाचे नगरसेवक यांच्या माध्यमातून शहरातील १५०० गरुजू कुटुंबाना अत्यावश्यक वस्तुंचे वाटप जनतानगर साबरहटी येथे आ. जयकुमार रावल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.आगामी तीन दिवसांत संपूर्ण शहरात टप्याटप्याने १५००लोकांना जिवनावश्यक वस्तु वाटप करण्यात येणार आहे. जिवनावश्यक वस्तु घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. कोरोना रोगाबाबत सगळ्यांंनी काळजी घेण्याचे आवाहन करत आमदार निधीतून शिंदखेडा, नरडाणा,दोंडाईचा येथे व्हेंटिलेटर उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, भाजपचे नेते कामराज निकम, नगराध्यक्ष रजनी वानखेडे, नगरपंचायतीचे गट नेते अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष भिला माळी, तहसीलदार साहेबराव सोनवणे, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, शिंदखेडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, नगरसेवक वंदना गिरासे, योगिता पाटील,युवराज माळी, चंद्रकांत गोधवाणी, सुभाष माळी,उमेश गिरासे, कैलास वाघ,मनोहर पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष दिनेश सुर्यवंशी,प्रविण माळी, शिंदखेडा मंडळाधिकारी पंडीत दावडे, तलाठी सुरेश बाविस्कर, पंकज पवार उपस्थित होते.