शिंदखेडा। येथील नगरपंचायतीतर्फे शहरात विविध भागातील विकास 1 कोटी 61 लाख कामांचा शुभारंभ आज येथील तांबोळी गल्लीत गटनेते प्रा सुरेश देसले व अनिल वानखेडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी प्रभारी नगर अध्यक्ष दीपक देसले, नगरसेवक उल्हास देशमुख, माजी नगर अध्यक्ष शहानाजबी बागवान, सुषमा चौधरी, बानुबाई भिल, सुनंदा माळी, निर्मला माळी, प्रमिला पाटील, अशोक देसले, चांद्रसिंग राजपूत, तुकाराम माळी निंबाजी सोनावणे, उशाबाई भिल , किरण चौधरी, मधुराबाई मराठे, किरण थोरात, शबनमबी मन्सूर, सोनाली महिरे, सुनील वडील आदी नगरसेवक उपस्थित होते.
वार्डावार्डात विकास कामे लवकरच होणार
येथील वार्ड क्रमांक 2 मधील नगरपंचायत, तांबोळी गल्ली, प्रधान गल्ली, पारधी गल्ली, रज्जाक नगर, येथे 35 लाख 73हजार 059 रुपये खर्चातून बंदिस्त गटार बांधकाम करणे तसेच तांबोळी गल्ली, प्रधान गल्ली येथे 27 लाख 84 हजार 445 रुपये खर्चातून काँक्रेटिकरण करणे वार्ड क्रमांक तीन मध्ये 38 लाख 10 हजार 739 खर्चातून विविध भागात बंदिस्त गटार बांधकाम करणे, वार्ड क्रमांक 1 मधील सिद्धार्थ नगर येथे 21 लाख 02 हजार 144 खर्चातून काँक्रेटिकरण रास्ता करणे, येथील विविध भागात 9 लाख 93 हजार 940 खर्चातून उघड्या गटारींवर ढापे बसविणे वार्ड क्रमांक 1 येथील मांग गारोडी वस्ती येथे 10 लाख 01 हजार 985 खर्चातून रास्ता काँक्रेटिकरण करणे वार्ड क्रमांक 3 येथे आर.के.पवार ते बुद्धीसागर पाटोळे यांच्या घरापर्यंत 18 लाख 12 हजार 907 रुपये खर्चातून रस्ता काँक्रेटिकरण करणे आशा एकूण 1 कोटी 61 लाख रुपये खर्चाच्या या विविध कामाचे शुभारंभ भूमिपूजन येथील तांबोळी गल्लीत गटनेते प्रा.सुरेश देसले व अनिल वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.