शिंदखेड्यात सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका वर्ग

0

शिंदखेडा। येथील जाधवनगर परिसरात सार्वजनिक वाचनालय व स्पर्धा परीक्षा अभ्यासिका वर्गाचा शुभारंभ प्रा दीपक माळी यांच्या हस्ते संपन्न झाला.येथील प्रा. अजय माळी व त्यांचे बंधू विजय माळी या दोघा बंधूनी शहरातील युवकांमध्ये वाचनाची व अभ्यासाची आवड निर्माण व्हावी म्हणून वरील उपक्रम सुरु केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सेवानिवृत्त शिक्षक बी.आर.पाटील यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ .एन .एस. पवार हे उपस्थित होते.अजय फाऊंडेशन सार्वजनिक वाचनालयाच्या पहिला जीवन गौरव पुरस्कार किसान विद्यालयातील क्रीडाशिक्षक एन. के. पाटील यांना देऊन गौरवण्यात आले.या वाचनालयात सध्या एक लाख रुपये किमतीची अभ्यासपूरक पुस्तके उपलब्ध असून अभ्यासू युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.