शिंदाडला बडोदा बँकेत चोरीचा प्रयत्न फसला ; लाखोंची रोकड सुरक्षित

0

चोरटे सीसीटीत कैद ; श्‍वानाने दाखवला नाल्यापर्यंतचा मार्ग

शिंदाड- गावातील बँक ऑफ बडोदा शाखेत चोरट्यांनी पाठीमागील बाजूचा दरवाजा व गेटचे लॉक तोडून लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला मात्र यश न आल्याने लाखोंची रोकड सुरक्षित राहिली. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली. चोरट्यांनी बँकेतील दोन सीसीटीव्हीचे नुकसान केले असून त्यांची छबी मात्र सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

चोरट्यांना संशय आल्याने पळ
बुधवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास दुचाकीचा उजेड दरवाजावर पडल्याने चोरटे अलर्ट झाले असावेत व त्यांनी पळ काढल्याचा अंदाज आहे. जळगाव येथील श्‍वानाने मागील बाजूच्या शेतापासून नाल्यापर्यंतचा मार्ग दाखवला तर चोरटे तेथून पसार झाल्याचा संशय आहे. चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती कळताच बँक व्यवस्थापक प्रतीक शहा, कर्मचारी अनुप ठाकूर, रितेश जैन, ज्ञानेश्वर नावडे, पंकज पाटील यांनी धाव घेतली. पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरू गुन्हा दाखल करण्यात आला.