शिंदाड । मागील काही दिवसांपासून अवैद धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाले आहे. राज्य तसेच महामार्गा लगतच्या दारु दुकाने शासनाने बंद केली आहे. त्यामुळे गावठी दारु विक्री जोरात वाढली आहे. दरम्यान शुक्रवार 21 रोजी पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शिंदाड परिसरातील अवैद गावठी दारु हातभट्टीवर दोनदा धडक कारवाई केली. यात दारु अड्डा उध्वस्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध धंद्येवाल्यांचे धाबे दणाणले आहे.
गावठी हातभट्टी वरील 8 हजार 500 रुपये किंमतीचे रसायन जागेवर नष्ट केले. तसेच दुसर्या कारवाईत 22 हजार किंमतीचे कच्चे रसायन, दारू बनविन्याचे सहित्यासह आरोपी सुपडु सिकंदर तडवी यास ताब्यात घेतले.
पिंपळगाव पोलीस स्टेशनला गु.र.न 6027/17 65 (ई) अन्वये दस्तगीर जहागीर तडवी, सुपडु सिकंदर तडवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी केशव पातोंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक वाघ, पोलीस हवालदा दिलीप पाटील, पोलीस हवालदार हरी पवार, पोलीस शिपाई किशोर राठोड़, विनोद पाटील, धीरज मंडलिक यांच्या पथकाने कारवाई केली