शिंदीत डॉक्टरावर हल्ला ; पिता-पूत्रासह तिघांना अटक

0

किरकोळ कारणावरून उफाळला वाद ; तालुका पोलिसात गुन्हा

भुसावळ- किरकोळ कारणावरून तालुक्यातील शिंदे येथे डॉक्टरावर हल्ला करून त्यांना जबर मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तालुका पोलिसात पिता-पूत्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही संशयीतांना अटक करण्यात आली. शिंदी येथील डॉ.सचिन पितांबर महाजन (35) यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील पितांबर महाजन यांनी संशयीत आरोपींना घरातील कचरा आपल्या बाजूला टाकू नये, असे सांगितल्यानंतर आरोपी दीपक महासिंग निकम, संतोष महासिंग निकम व महासिंग काशीनाथ निकम यांनी लोखंडी पट्टीने मारहाण केली. लोखंडी पट्टी लागल्याने डॉ.महाजन यांच्या चेहर्‍यावर तसेच मानेवर जखम झाल्याने त्यांना पालिकेच्या दवाखान्यात हलवण्यात आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास हवालदार रीयाज शेख करीत आहेत.