शिंदेंनी केला करोडोचा अपहार!

0

जळगाव । महाराष्ट्र स्टेट केमिस्ट असोसिएनचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे यांनी स्थापन केलेल्या कंपनीकडे जळगाव जिल्ह्यातील सभासदांची एकून 3 कोटी 56 लाख घेणे असून कायम टाळाटाळ करण्यात येत आहे. अद्यापपर्यंत 35 लाख देण्यात आले महाराष्ट्र स्टेट केमिस्ट असोसिएशन आणि जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर असोसिएशन यामध्ये मोठ्या प्रमाणात अपहार करण्यात असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टी केमिस्ट महासंघाने भाजपच्या वसंत स्मृती येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. यावेळी भाजप केमिस्ट महासंघाचे किशोर भंडारी, संजय नारखेडे, दीपक जोशी, निशिकांत मंडोरे, शावीर चीत्तारवाला, कनकमल राका, दिनेश येवले,प्रभाकर कोल्हे सतीश अग्रवाल आदी उपस्थित होते.

सभासदांना न्याय मिळण्यासाठी लढा
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा मेडिकल डीलर असोसिएशनच्या वतीने अन्याय करण्यात येत आहे. आम्ही देखील या संघटनेत सभासद आहोत. मात्र आम्हाला दुय्यम वागणूक देण्यात येत आहे. म्हणून आम्ही तीन वर्षापासून भाजप केमिस्ट संघटनेच्या वतीने लढा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. भाजप सरकारचा आम्हाला पूर्णपणे पाठिबा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना झालेल्या अन्यायाबाबत निवेदन देण्यात आले आहे. सरकार दरबारी आणि न्यायालयात आमचा पाठपुरावा सुरु असल्याची माहिती संयोजक संजय नारखेडे यांनी दिली.

शिवनिकेतन ट्रस्टला 30 लाख
महाराष्ट्र स्टेट केमिस्ट असोसिएशन नावाची कंपनी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी स्थापन केली. यामध्ये जळगाव जिल्हातून मेडिकल असोएशन च्या माध्यमातून पैसे देण्यात आले. अनेक वर्षांमध्ये मोठे अपहार आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती न पुरवता करण्यात आले. जळगाव जिल्हा मेडिकल डीलर असोसिएशनच्या माध्यमातून नियमबाह्य 30 लाख परस्पर समाजसेवाच्या नावावर देण्यात आले. होलसेल विक्रेत्यांची नेहमी अडवणूक करण्यात येते. जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या संघटनांमध्ये मोठा अपहार करण्यात आला. औषधी निर्मिती करणार्‍या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी मागण्यात येत असून हुकुमशाही राजवट जिल्हा मेडिकल आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट असोसिएशन करीत असून प्रशासन व सरकार दरबारी न्याय मागण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष किशोर भंडारी यांना बोलताना सांगितले आहे.

23 रोजी उपोषण तर 24 रोजी पुतळा दहन
केमिस्ट महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाचे सर्व पदाधिकारी व जळगाव जिल्हा भा.ज.प केमिस्ट महासंघाचे पदाधिकारी व सभासद हे 23 मे रोजी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे. तर्क 24 मे रोजी भ्रष्ट्राचाराचा सामुहिक पुतळा दहन करण्यात येणार आहे. केमिस्ट महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष निशिकांत मंडोरे शावीर चित्तारवाला व संयोजक संजय नारखेडे यांनी केले आहे.