शिकाऊ उपजिल्हाधिकार्‍यांची बॅग लंपास

0

चाळीसगाव – औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात शिकाऊ उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या महिला अधिका-यांची 18 हजार 100 रुपये मुद्देमाल असलेली बॅग चाळीसगाव बस स्थानकावर बसमधून लंपास झाल्याची घटना आज पहाटे 10.30 वाजेच्या सुमारास घडली. चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.