शिक्रापूर । अजिंक्यतारा क्रीडा प्रतिष्ठान व विद्याधाम प्रशाला शिक्रापूर आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रेखा बांदल व शिरूर पंचायत समिती सभापती सुभाष उमाप यांनी केले.
प्रतिष्ठानमार्फत शिक्रापूरातील वेताळबुवा स्टेडियममध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यावेळी बोलताना बांदल यांनी प्रतिष्ठान व विद्याधाम प्रशालेचे कौतुक केले. प्रतिष्ठान शिक्रापूर व परिसरात विविध स्पर्धेचे आयोजन करून शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना खिलाडूवृत्ती दाखवण्याची संधी ूमिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सरपंच जयश्री भुजबळ, रामभाऊ सासवडे, राहुल टाकळकर, गोरख सासवडे, नवनाथ सासवडे, सागर सायकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.