शिक्रापूर । शिरूर तालुक्यातील होळी सण साधेपणाने परंतु पारंपरिकपद्धतीने पूजाअर्चा करून उत्साहात साजरी करण्यात आली.
शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव, जातेगाव, टाकळी भीमा या गावांमध्ये होळी उत्साहात साजरी करण्यात आली. शिक्रापूर येथील मोती चौकातील मानाची होळी पोलिस पाटील श्रीकांत विरोळे यांच्या हस्ते पेटवण्यात आली.
त्यांनतर प्रत्येक घरोघरी नागरिकांनी होळी पेटवण्याचा आनंद घेऊन गावातील प्रत्येक देवदेवतांच्या मंदिरात पुरणपोळीचा नैवद्य दाखवला. तर दुसर्या दिवशी धुलिवंदनाच्या निमित्ताने तरुण कार्यकर्ते व नागरिकांनी विविध रंग एकमेकांच्या अंगावर टाकून मोठ्या उत्साहात धुलिवंदन साजरा केले. प्रत्येक कुटुंबाने पाण्याचा गैरवापर टाळला. त्यामुळे पाण्याची बचत झाली.