लोहार- येथील डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यल्यात शिक्षक दिन कार्यक्रमानिमित्त लोहारा गावातील वेगवेगळ्या पाच ही शाळेतील निवडक पाच शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन निवृत्त मुख्याध्यापक भि शा शेळके यांनी केले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे संचालक आबासाहेब शेळके हे होते.
कार्यक्रमच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कै.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या नंतर विद्याल्याच्या वतीने पहुन्यांचे तसेच उपस्तितांचे स्वागत करण्यात आले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी एस निकम यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश विशद केला.
यावेळी ज्या पाच शिक्षकांचा सत्कार करण्यात आला त्यात डॉ.जे.जी.पंडित विद्यालयाचे शिक्षक पि व्ही जोशी जि प कन्या विद्याल्याच्या प्र मुख्याध्यापिका मीनाक्षी बारबंद, जि प मराठी मुलांची शाळेचे शंकर मधुकर गायकवाड, जि.प.उर्दू शाळेचे शेक ईस्माइल नियाज मोहमद जनाब तसेच जयहिंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय रोकडे यांचा सत्कार यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते वरील आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आबासाहेब शेळके यांनी मि एक निवृत्त शिक्षक आहे त्यामुळे मला शिक्षकां बद्दल आदर आहे त्या भावनेतूनच मि हा ऊपक्रम मध्यंतरी च्या खंडा नंतर पुन्हा सुरु केला आहे व यापुढे सुरु ठेवणार असल्याचा मनोदय आबासाहेब शेळके यांनी यावेळी व्येक्त केला या नंतर ज्या विद्यार्थीनीनी संपूर्ण दिवस शाळेत शिक्षक होऊन शाळा चालविली त्या विद्यार्थिनीचे भाषण यावेळी झाले या नंतर विद्यार्थ्या कडुन शिक्षकाना भेट वस्तु देण्यात आल्या या वेळी सत्कार्थी शिक्षकानी मनोगत व्येक्त केले त्यात पि व्ही जोशी ,श्रीमती मीनाक्षी बारबंद ,शंकर गायकवाड यांनी मनोगत व्येक्त केले ए ए पटेल सर यांनी देखील यावेळी मनोगत व्येक्त केले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन पंचायत समिती सदस्यासौ अनीता ताई चौधरी, सरपंच सौ आशा ताई चौधरी ,मुख्याध्यापक बी एस निकम ,संपर्क आधिकारी ए ए पटेल , पत्रकार नाना राजपुत, दिलीप चौधरी महेन्द्र शेळके हे हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय शिरपुरे यांनी केले तर आभार पि एम सुर्वे यांनी मानले .यावेळी मोठ्या संखेने विद्यार्थी हजर होते.