शिक्षकांचा 1 फेबुवारीला महापालिकेवर धडक मोर्चा

0

पिंपरी ः पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षकांचा महानगरपालिकेवर 7 वा वेतन आयोग व इङज ची कामे रद्द करण्यासाठीच्या मागण्यांसाठी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
म.रा.पदवीधर, प्राथ. शिक्षक व केंद्रप्रमुख सभा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा संघटनेच्या वतीने शनिवार दि. 1 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी साडे तीन वाजता हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करा, शिक्षकांची इङज कामे रद्द करावीत अशा मागण्यांसाठी शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन पदवीधर शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. मोर्च्याची सुरुवात 3:30 ला महात्मा फुले पुतळा लोखंडे सभागृहाशेजारी पिंपरीपासून पुढे आंबेडकर चौक पिंपरीतुन- पुणे -मुंबई महामार्गाच्या दिशेने मोरवाडी चौकातून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी पूतळा मार्गे पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत प्रवेशद्वार असा असणार आहे.