शिक्षकांचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर जीआर होळी आंदोलन

0

राजेंद्र पाटील – पालघर । पालघर जिल्ह्यातील उच्च प्राथमिक शाळांतील इ. 6 वी ते 8 वी वर्गाची पट संख्या 100 पेक्षा जास्त आहे. अशा राज्यातील एकूण 1835 शाळांमधे कला, क्रीड़ा आणि कार्यानुभव विषय शिकवण्यासाठी प्रत्येकी 1 शिक्षक या प्रमाणे अंशकालीन निदेशकांची 5505 पदे निर्माण करण्यास व कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर नियुक्तीस मान्यता देण्याबाबत शासनाने दि. 21 ऑगस्ट 2014 चा निर्णय निर्गमित केला होता. सादर निर्णयाची अंमलबजावणी शासनस्तरावर न झाल्यामुळे उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. तो अर्ज निकाली काढताना न्यायालयाने काही निष्कर्ष काढले होते. यावर शासनाने 1 सप्टेंबर 2017 रोजी जी. आर. काढला असून त्यामध्ये काही जाचक अटी लादल्या आहेत. याविरोधात पालघर जिल्ह्यातील कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांनी जिल्ह्याधिकारी कार्यालयावर सदर जीआरची होळी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी आंदोलन केले.

जिल्ह्यातील शिक्षक सहभागी
सर्व शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत सामावुन न घेता अन्याय कारक शासन निर्णय काढल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कला क्रीड़ा व कार्यानुभव शिक्षक संघाच्या वतीने जिल्ह्यातील यह्या विषयाचे सर्व शिक्षक रस्त्यावर उतरून पालघर जिल्हाधिकारी कार्यालया समोर या निर्णयाची होळी करून आंदोलन केले. या आंदोलनात पालघर जिल्ह्यातील सर्वच शिक्षक सहभागी झाले होते. या शासन निर्णायमधे सद्यःस्थितीत कार्यरत असलेल्या अतिथी निदेशक व 2012-13 या वर्षामधे काम केलेल्या निर्देशकांवर अन्याय होत असून, वयाची अट आणि पूर्वी अंशकाली निदेशक म्हणून काम केलेल्या निदेशकांची परीक्षा देणे ह्या बाबी अन्यायकारक असल्याचा आरोप करत तसेच इतर मागण्या घेऊन हे होळी आंदोलन पालघर जिल्हाधिकारी कार्यालयसमोर करण्यात आले आणि या बाबतीतील निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला.