शिक्षकांचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी पदाधिकार्‍यांची बैठकीत चर्चा

0
हिंदी, उर्दू मुख्याध्यापकांच्या तात्काळ नेमणुका
शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांचे आदेश
पिंपरी चिंचवड : हिंदी व उर्दू माध्यमांच्या शाळेत मुख्याध्यापकांच्या नेमणुका तात्काळ करण्याबाबतचे आदेश सभापती यांनी दिले आहे. मराठी माध्यमांच्या शाळेत मुख्याध्यापक पद रिक्त असताना सेवाज्येष्ठता यादीनुसार संभाव्य मुख्याध्यापक पदोन्नती प्राप्त शिक्षकांची प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नियुक्त करण्यात यावे. जेणेकरून त्या प्रभारी मुख्याध्यापकांना मुख्याध्यापक पदाचा अनुभव येईल, अशा सुचना देखील यावेळी देण्यात आल्या. मंगळवार दि. 11 रोजी दुपारी महानगरपालिका शिक्षण सभापती सोनाली गव्हाणे यांच्या दालनात शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक संघटना सदस्यासोबत सभापती सोनाली गव्हाणे यांच्यात चर्चा झाली.
या पदाधिकार्‍यांमध्ये झाली चर्चा..
या बैठकीला शिक्षण समिती उपसभापती शर्मिला बाबर, शिक्षण समिती सदस्य शारदा सोनावणे, सुवर्णा बुर्डे, संगीता भोंडवे यांच्यासह संघटना अध्यक्ष मनोज मराठे, सरचिटणीस सतीश पाटील, पदाधिकारी नामदेव फलफले, देशमुख सर, श्री. चितोडकर, कुकनर सर, श्री. बिसेन, राऊत सर, महिला प्रमुख गिरी मॅडम आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मराठे यांनी शिक्षकांच्या समस्या शिक्षण समिती पुढे मांडल्या.
शिक्षकांच्या शासन निर्णयानुसार नेमणूका व्हाव्यात…
शिक्षक कल्याण निधी या संदर्भात माहिती मिळावी, यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. दहा कलमी कार्यक्रमांतर्गत बक्षीस म्हणून मिळालेली उर्वरित रक्कम संबंधित शाळांना मिळावी. विज्ञान विषयाच्या रिक्त असलेल्या पदवीधर शिक्षकांच्या नेमणुका कार्यरत विज्ञान विषयातून शासन निर्णयानुसार करण्यात याव्या, अशी मागणी संघटनेने केली. उपरोक्त संबंधित सर्व शिक्षकांच्या समस्या समजावून घेऊन त्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्‍वासन सभापती सोनाली गव्हाणे यांनी दिले.
वेतनश्रेणी नियमित द्या…
प्रथमतः शिक्षणसेवक यांना नियमित वेतनश्रेणी मिळाल्या संदर्भात सभापती व पदाधिकारी तसेच प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग यांना धन्यवाद देऊन संघटनेने अभिनंदन केले. सदर शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे, धन्वंतरी योजना लागू झाल्यानंतर त्या शिक्षकांचे फॉर्म भरून घेणे, त्यांचे काम मार्गी लागावी. शैक्षणिक साहित्य शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला मिळण्यासंदर्भात संघटनेच्या वतीने मागणी केली. निवड व वरिष्ठ श्रेणी पात्र शिक्षकांना तात्काळ मिळावी, या संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकार्‍यांना तात्काळ या याबाबत प्रलंबीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना  सभापती यांनी दिल्या.