शिक्षकांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी काम करणार

0

जळगाव । नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघाची निवडणुक जाहिर झाली आहे. शासन दरबारी शिक्षकांच्या प्रश्‍नांना नेहमीच दुय्यम स्थान दिले जात आहे. यासाठी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते निवडणुक लढविणार असल्याची माहिती टीडीएफ, माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक संघटना बचाव समितीचे उमेदवार किशोर दराडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी संचालक अजय जैन, माणिक शिंदे, प्राचार्य अनंत जोशी, प्रताप दाभाडे, शांतीलाल घनवटे, हरीश मुंडे, शरद सोनवणे, शिवशंकर कांबळे आदी उपस्थित होते.

52 हजार 300 मतदारांचा समावेश
यावेळी माहिती देतांना दराडे म्हणाले कि, त्यांना शिवसेना, राष्ट्वादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातर्फे पुरस्कृत केल्या जाण्याच्या ऑफर आल्या आहेत. लवकरच याबाबत ते निर्णय घेणार आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते निवडणुक लढविणार आहेत. या निवडणुकित 52 हजार 300 मतदार असुन त्यापैकी 14 हजार 500 मतदार हे नाशिक जिल्ह्यातुन आहेत. नाशिक जिल्ह्यातुन दराडे हे एकमेव उमेदवार निवडणुकिच्या आखाड्यात असणार आहेत. टिडीएफ मध्ये अनेक गट असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीत दिसुन येणार आहे. पहिल्या सारखी टिडीएफ राहिली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.