शिक्षकांना नवीन शिक्षण पद्धतीशी जोडण्याचा नेक्स्ट एज्युकेशनचा प्रयत्न

0

के-१२ शिक्षकांसाठी ‘मूक्स’ लॉन्च करणारी पहिली एडटेक कंपनी

मुंबई : नेक्स्टएज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने अलीकडेच नेक्स्ट गुरुकुल या आपल्या कम्युनिटी मंचावर मूक्स (मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस) ची सुरुवात केली आहे. मूक्सचा उद्देश शिक्षकांना के-१२ शिक्षण क्षेत्रातील नवीन शिक्षण पद्धती आणि जागतिक शिक्षण पद्धतींची माहिती देण्याचा आहे. शिक्षकांना २१व्या शतकातील लर्निंगची चांगल्या प्रकारे माहिती देण्यासाठी पाच ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. यात अर्ली इयर्स: लर्निंग अँड डेव्हलपमेंट, कम्प्युटर मस्ती इन द क्लासरूम, टीचिंग ऑफ इंग्लिश इन इंडियन क्लासरूम, एन्व्हायर्नमेंटल स्टडीज फॉर द ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी आणि वंडर मॅथ्स इन द क्लासरूम यांचा समावेश आहे.

हे नवीन ऑनलाइन अभ्यासक्रम शिक्षकांना नेक्स्ट करिकुलमची संकल्पना समजावून देऊ शकतील व ती संकल्पना त्यांना आपल्या शिक्षण पद्धतीत सामील करण्यात मदत होईल. हे अभ्यासक्रम अत्यंत प्रतिष्ठित आणि अनुभवी शिक्षणतज्ज्ञ, विषयातील तज्ज्ञ और इन्स्ट्रक्शनल डिझाइनर्सद्वारा तयार करण्यात आले आहेत, जे शिक्षकांना समग्र शैक्षणिक अनुभवासाठी आवश्यक गुणवत्तेच्या दृष्टीने सक्षम बनवतील. मूक्स विविध विषयांच्या सखोल ज्ञानासाठी शिक्षकांना संपूर्ण भारत आणि मध्य-पूर्वेकडील आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी संवाद साधण्याची आणि सहभाग घेण्याची संधी देखील देईल. सर्व शिक्षकांना प्रत्येक अभ्यासक्रमाच्या समाप्तीनंतर ऑनलाइन सर्टिफिकेट देखील देण्यात येईल.