रावेर : घरासारखी संस्कृती शाळेत राबविल्यास विद्यार्थी सुसंस्कृत होतो. प्रत्येकाच्या यशामागे त्यांच्या शिक्षकांचा मोठा हातभार असतो. प्रत्येक विद्यार्थ्याला भरभरुन यश मिळावे यासाठी शिक्षक धडपडत असतो, असे प्रतिपादन ग.स. सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम बोरोवले यांनी येथील डॉ. एन.एन. अकोले माध्यमिक विद्यालय आयोजित कलाविष्कार स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना सांगितले. यावेळी व्यासपीठावर माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अरविंद चौधरी, प्रभात चौधरी, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, उपनगराध्यक्ष सुधीर पाटील, भगवती प्रसारक मंडळचे अध्यक्ष राजीव पाटील, ज्ञानेश्वर महाजन, बाजार समितीचे संचालक प्रमोद धनके, शैलेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
नवनिर्वाचित नगरसेवकांचा करण्यात आला सत्कार
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक बँक संचालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच अमेरिकेतून खिरोदा येथील ग.स. सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम बोरवले यांना डी. लिट पदवी मिळाल्याने त्यांचा सर्व मान्यवरांतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी नगरसेवक प्रल्हाद महाजन, राजेंद्र महाजन, सूरज चौधरी, संगीता महाजन, यशवंत दलाल, संगीता वाणी, असदउल्ला खा महमूद खा, हमीदाबी पठान, आसिफ मोहम्मद, शेख सादिक, रंजना गजरे, शारदा चौधरी, संगीता अग्रवाल, शेख कलीम, शंकर राऊत, योगेश गजरे, सूर्यभान चौधरी, संजय वाणी, पंकज पाटील, संजय पाटील, प्रकाश पाटील, राहुल पाटील, सुनील पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक राजेंद्र अकोले यांनी केले.