शिक्षकाकडे घरफोडी : 15 हजारांचा मुद्देमाल लांबवला

Burglary of a teacher in Muktainagar: 15,000 worth of property was recovered मुक्ताईनगर : शहरातील शिक्षकाच्या बंद घरातून चोरट्यांनी 14 हजार 200 रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना सोमवार, 22 रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांचा पोलिसांकडून शोध
शिक्षक लक्ष्मण धोंडू पाटील (मेहुण, ता.मुक्ताईनगर) हे चिंचोल-चांगदेव रस्त्यावरील सुजल तोलकाट्याच्या पाठीमागे वास्तव्यास आहेत. 21 रात्री नऊ ते 22 रोजी सकाळी 8.30 वाजेदरम्यान चोरट्यांनी सुजल तोल काट्याच्या ऑफिसच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे गज वाकवून प्रवेश करीत 12 हजार रुपये किंमतीचे इन्व्हर्टर व बॅटरी तसेच दिड हजार रुपये किंमतीचे होम थिएटर व आठशे रुपयांची रोकड असा एकूण 14 हजार 300 रुपयांचा ऐवज लांबवला. तपास हवालदार अशोक जाधव करीत आहेत.