धुळे। शहरातील जळगाव जनता बॅक कॉलनीत रहाणार्या एका शिक्षकाच्या घरी घरफोडी करुन चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन रामदास जाधव रा. जळगाव जनता बँक कॉलनी, धुळे हे पिंपळादेवी हायस्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
तीन दिवसांपूर्वी ते परिवारासह बडोदा येथे गेले होते. घर बंद असल्याने या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील 19 ईंची एलसीडी, पाच हजार रूपये रोख, दोन तोळे सोने, मनगटी घड्याळ असा सुमारे एक लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला. सदर चोरीचा प्रकार चेतन जाधव यांना दि 2 रोजी सकाळी घरी आल्यावर लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना संपर्क साधला.