अमळनेर- तालुक्यातील पिंगळवाडे जि.प.उच्च प्राथमिक शाळेत दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. लोकशाही पध्दतीने ऑनलाईन मतदान करून विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीचा उमेदवार निवडतांना मतदान प्रक्रियेच्या अवघ्या काही सेंकदातच ऑनलाईन निकालाचा सुखद अनुभव घेतला. यासाठी https://googl/forms/c8VLKRldyCbVTE6P2 ही गुगल लिंक तयार करण्यात आली होती. या निवडणूक प्रक्रियेची निर्मिती व संकल्पना उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांची होती. यासाठी त्यांना मुख्याध्यापिका वंदना ठेंग, पदवीधर शिक्षक प्रवीण पाटील, उपशिक्षक रवींद्र पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.