जळगाव। शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांच्या प्रलंबीत तक्रारींन संदर्भात सहविचार सभा घेण्यात आली. शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. शिक्षक भारतीच्या मागणीनुसार शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. सर्व अतिरीक्त शिक्षकांचे पगार ऑनलाईन केले आहेत.
विभागिय अध्यक्ष राजेंद्र लोंढे यांनी अभिनंदन केले. वैयक्तिक मान्यतांच्या बाबतीत सकारात्मक चर्चा झाली. डीसीपीसचे दोन हप्ते कपात होत असल्याचे निदर्शनास आनुन दिले. अनुकंप मान्यता लवकर दिल्या जातील असे सांगितले. भविष्य निर्वाहच्या तपशील सर्व विद्यालयास विद्यालयात वेळेवर पोहचवण्याचे एडके यांनी मान्य केले. सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. आरटीई प्रमाण पत्र अद्याप शाळांना वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे विद्यालयांचे वेतनेतर अनुदान थांबले आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी लवकर वाटप करावेत अन्यथा आंदोलनाचा ईशारा जिल्हाध्यक्ष नारायण वाघ यांनी दिला आहे.