शिक्षक मतदार संघात शिवसेना पुरस्कार उमेदवाराचा विजय ः धुळे पदाधिकार्‍यांनी केला जल्लोष

0

धुळे- नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षक सेना व शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांच्या विजयानिमित्त धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे फटाक्यांची आतशबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी सुज्ञ जाणकार मतदारांनी शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांना निवडून दिले. शिक्षकांच्या प्रश्‍नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दराडे सतत प्रयत्नशील राहतील, असा विश्‍वास जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी याप्रसंगी व्यक्त केला. राज्यातील पदवीधर निवडणूका, शिक्षक मतदार संघ यासह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेने शिवसेना  शिक्षक मतदार संघ निवडणूक दराडेंचा विजय शिवसेनेतर्फे आनंदोत्सव साजरा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विचार, कार्य पद्धतीवर विश्‍वास ठेवत शिवसेनेचे उमेदवार निवडून दिले. निवडणूकांमध्ये सेनेच्या उमेदवारांचा विजय हा पक्षप्रमुखांनी दिलेला स्वबळाचा नारा याकडे यशस्वी वाटचाल होत असल्याचे देखील हिलाल माळी यांनी प्रतिक्रीया देतांना सांगितले. आनंदोत्सव साजरा करतांना प्रथम महापौर भगवान करनकाळ, माजी जिल्हाप्रमुख भूपेंद्र लहामगे, विधानसभा संघटक डॉ.सुशिल महाजन, राजेंद्र पाटील, युवा नेते सिद्धार्थ करनकाळ, अ‍ॅड. पंकज गोरे, संदीप चव्हाण, शाखाप्रमुख कैलास मराठे,
पुरुषोत्तम जाधव, हेमा हेमाडे, रवींद्र माळी, मुन्ना पठाण, रामदास कानकाटे, मुरलीधर जाधव, नरेंद्र अहिरे, भटू गवळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.