शिरपूर । महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा कार्यकारिणी द्वारे शिरपूर तालुक्याची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी संचालक ग.स.बँक सी.एस.पाटील व कार्यक्रमाचे प्रमूख पाहुणे म्हणुन शिक्षकसेनेचे जिल्हाध्यक्ष सी.एन. पाटील , सरचिटणीस अशोक तोरवणे, कार्याध्यक्ष सतीश चौधरी , कोषाध्यक्ष पंडित पाटील , जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील सूर्यवंशी व सहसरचिटणीस विकास परदेशी उपस्थित होते.
सचिवपदी रत्नाकर सोनवणेंना संधी
या बैठकीत सर्वानुमते उमाकांत हिरालाल गुरव यांची शिरपूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. रत्नाकर धनराज सोनवणे यांची सरचिटणीसपदी, विजयानंद भिका शिरसाठ यांची कार्याध्यक्षपदी, संदीप साहेबराव पाटील , कोषाध्यक्षपदी, मनोहर रमेश शिंदे यांची प्रसिध्दी प्रमुखपदी तसेच संजय लोटन पवार व राकेश देवेंद्र देवरे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवडकरण्यात आली. तसेच संपर्कप्रमुखपदी दिनेश श्रीराव व तालुका संघटक म्हणुन प्रवीण रामचंद्र तोरवणे यांची निवड करण्यात आली
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
यावेळी जितु बाविस्कर , देविदास निळे, विजय सोनार, अविनाश पाटील, समाधान धनगर, विनोद मोरे, अरविंद नकाते, रवींद्र बडे, गिरीश माने, सुभाष साबळे, बाजीराव कळसुले, प्रवीण नाईक, शरद चौधरी, पंडित नाहिदे, भास्करराव बेलदार या शिक्षकबंधूंची विशेष उपस्थिती होती. प्रास्ताविक स्वप्नील सूर्यवंशी यांनी केले. संदीप सोनवणे यांनी आपले विचार मांडले तर अरविंद नकाते यांनी आभार मानले.