शिक्षक हे भावी पिढीचे शिल्पकार – डॉ. चौधरी

0

मगर महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

हडपसर : शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. आई-वडिलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात. शिक्षक पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्वावर चांगले संस्कार करून पैलू पाडतात. भविष्यातील जबाबदार नागरिक ते घडवित असतात म्हणून शिक्षक हे भावी पिढीचे शिल्पकार असतात, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांना श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून वर्गात अध्यापन केले. प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, डॉ. आनंद महाजन, प्रा. अनिल जगताप, डॉ. मेघना भोसले, डॉ. शुभांगी औटी याप्रसंगी उपस्थित होते.