शिक्षणाधिकार्‍यांसह एकाला अटक

0

धुळे । माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण पाटीलसह उपशिक्षण अधिकारी किशोर पाटील यांना आज दुपारी दोन लाख तीस हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. नंदुरबार ऍन्टी करप्शन विभागाने ही कारवाई केली. गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी त्यांनी तक्रारदराकडे सदर लाच मागितली होती. यातील माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रविण पाटील हे पुर्वी जि.प. शाळेत नोकरी करीत होते.

त्यानंतर चोप़डामधील खडगाव येथे ते राहण्यासाठी आले. त्यानंतर त्यांची बदली होऊन धुळे येथे पहिल्यांदाच माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून बढती मिळाली होती. तसेच प्रविण पाटील यांच्या पत्नी देखील चोपडामधीलच वेल्हे येथील जि.प. शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. पाटील यांच्या मागणीनुसार तक्रारदाराने पैसे देण्याची तयारी दर्शवली व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

त्यानुसार आज दुपारी नंदुरबारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठरलेल्या ठिकाणी सापळा रचला आणि त्यात प्रविण पाटील व किशोर पाटील दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. प्रभारी पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.