जळगाव । जिल्हा परिषदेतील प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. मे महिन्यात जिल्हा परिषदे अंतर्गत येणार्या सर्व विभाच्या बदल्या करण्यात येत असतात. जिल्हा परिषदे अंतर्गत येणारे शिक्षण विभागातील बदल्यां व्यतिरिक्त इतर विभागातील बदल्या लवकरच होणार आहे. येत्या ते 11 मे पर्यत संपूर्ण प्रशासकीय बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वाधिक बदल्या शिक्षण विभागातील असल्याने या विभागाची बदली प्रक्रिया स्वतंत्रपणे राबविण्यात येणार आहे. शिक्षण विभागातील बदलीची संख्या अधिक असल्याने जिल्हा परिषद बदली प्रक्रियेतुन शिक्षण विभागाला वगळण्यात आले आहे.
शिक्षण विभागातील बदली 31 मे पर्यत
शिक्षण विभागाला 31 मे पर्यत बदली प्रक्रिया पुर्ण करावयाचे आहे. तर उर्वरित प्रशासकीय बदल्या ते 11 मे दरम्यान पूर्ण होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य, ग्रामपंचायत, महिला बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, सिंचन, पाणीपुरवठा या विभागातील बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचार्यांची त्या-त्या विभागाकडून सामान्य प्रशासन विभागाने माहिती मागविली आहे. अंतिम बदल्यांसाठी येत्या 8, आणि 11 मे पर्यत पूर्ण होणार आहेत. शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात राज्य शासनाने नवीन निकष लावले आहेत. 10 वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी ऑनलाइन बदली प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षण विभागाने जिल्ह्यातील अवघड व सोपे क्षेत्राबद्दल सर्वेक्षण करुन माहिती मागविली आहे.