शिक्षेविरोधात सज्जन कुमारची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

0

नवी दिल्ली : शीखविरोधी दंगली प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सज्जन कुमारने दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात शनिवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

१९८४ मध्ये दिल्लीतील दंगली प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने सोमवारी सज्जन कुमारसह सहा जणांना दोषी ठरवले होते. सज्जनकुमारला हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सज्जन कुमारने शनिवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, सज्जन कुमार व अन्य दोषींनी ३१ डिसेंबरपर्यंत शरण येण्याचे आदेश दिले आहेत. शरण येण्यासाठीची मुदत एक महिन्यांची वाढवून द्यावी , अशी मागणी करणारी याचिका सज्जन कुमारने हायकोर्टात दाखल केली होती. मात्र, शुक्रवारी हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली.