ओव्हल । भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारतीय संघाचा विजयाचा मार्ग सुकर झाला.दक्षिण अफ्रिका संघावर विजय मिळाण्याबरोबर ओव्हलच्या मैदानावर शिखर धवने 16 डावात 1000 धावांचा विक्रम सुध्दा आपल्या नावावर केला.या विक्रमाबरोबर शिखर धवनने मास्टर ब्लाटर सचिन तेडूलकर याचा विक्रम मोडीत काढला आहे.
सचिन आणि गांगुली यांनाही मागे टाकले
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणखी एक धडाकेबाज खेळी करत शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे शिखर धवनने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनाही मागे टाकलस आहे.शिखर धवन याला आयसीसी टूर्नामेंट्समध्ये एक हजार धावा बनवायला 16 इनिंग्स लागल्या. तर हाच रेकॉर्ड सचिन तेंडुलकरने 18 इनिंगमध्ये केला आहे. सौरव गांगुली, हर्षल गिब्स आणि मार्क वॉ यांना हा 1000 धावा करण्यासाठी 20 इनिंग्स खेळाव्या लागल्या होत्या. त्याचबरोबर शिखर धवनने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त हाफ सेंच्युरी म्हणजेच 50 धावा बनवण्याच्या रेकॉर्डचीही बरोबरी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शिखर धवनने आत्तापर्यंत सहा हाफ सेंच्युरी केल्या आहेत. तर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनीही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहा हाफ सेंच्युरी केल्या आहेत. शिखर धवनने 2013 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत 5 मॅचेसमध्ये 90.75 च्या सरासरीने 363 धावा केल्या होत्या. यंदाच्याही चॅम्पियन्स ट्रॉफीत शिखर धवनने आतापर्यंत झालेल्या तीन मॅचेसमध्ये 271 रन्स केले आहेत. त्यामुळे तो पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक रन्स करण्याच्या शर्यतीत पहिला आहे.