भोपाळ-कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज नोव्हेंबरमध्ये मध्यप्रदेशात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यावर आहे. यावेळी राहुल गांधी यांनी आमसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी शिप्रा नदीच्या पाणीच नमुना उपस्थित जनसमुदायाला दाखविले. शिप्रा नदीच्या स्वच्छतेसाठी ४०० कोटींचा खर्च करण्यात आला मात्र अद्यापही ही नदी दुषितच आहे असे आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. शिप्रा नदीचा पाणी भाजपच्या एखाद्या मंत्र्यानी प्यावे, पाणी पिल्यास ती व्यक्ती बेशुद्ध होईल असे राहुल गांधी यांनी सांगितले.
शिप्रा नदीच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार केला आहे असे आरोप राहुल गांधी यांनी केले आहे.