शिबीरात विद्यार्थ्यांची विविध प्रात्यक्षिके सादर

0

जळगाव। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरु असलेल्या राष्ट्रीय सेवायोजनेच्या राज्यस्तरीय प्रेरणा नेतृत्व विकास शिबिराचा रविवारी 20 ऑगस्ट रोजी समारोप होणार आहे. 16 ऑगस्ट पासून सुरु झालेल्या या राज्यस्तरीय शिबिरात 24 विद्यापीठांमधील 150 पेक्षा अधिक राष्ट्रीय सेवायोजनेचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. नेतृत्व विकासावर विविध अंगांनी विद्याथ्र्यांशी तज्ज्ञांमार्फत संवाद साधला जात आहे. याशिवाय विद्याथ्र्यांच्या गट चर्चा, विविध स्पर्धा देखील आयोजित केल्या आहेत.

विद्यार्थ्यांसह पालकांची उपस्थिती
शनिवार, दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.मंजुषा क्षीरसागर यांचे व्याख्यान झाले. त्यांनी विद्याथ्र्यांकडून विविध प्रात्यक्षिके करुन घेतली व त्यातून नेतृत्वाचे गुण स्पष्ट केले. स्वत:चा शोध घेत असताना आपल्यातील क्षमतांची जाणीव होते. चारित्र्यसंवर्धनात कृती, विचार आणि सवय यांना महत्व असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतरच्या सत्रात रायसोनी इन्स्टिटयूटचे प्रा.रफीक शेख यांचे व्याख्यान झाले. त्यांनी नेतृत्वाचे गुण विशद करताना नेतृत्व करणाज्या व्यक्तीत आत्मविश्वास, विश्वासार्हता, वातावरणात बदल करण्याची क्षमता, प्रामाणिकपणा या गुणांची गरज असल्याचे विविध उदाहरणे देत स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा.एस.टी.इंगळे, समन्वयक डॉ.अजय सुरवाडे उपस्थित होते. रविवारी 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता या शिबिराचा समारोप होणार आहे.