शिरपुरात पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण

0

शिरपूर। शिरपूर पंचायत समितिमार्फत दिनांक 20 जुलै ते 28 जुलै या काळात एच .आर .पटेल माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता सातवी या वर्गाचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. प्रशिक्षणास अध्यक्षा प्राचार्या एम.एस.अग्रवाल, उदघाटक डॉ . नीता सोनवणे शिक्षण विस्तार अधिकारी पं.स.शिरपूर मार्गदर्शक शिक्षक एन .बी .पाटील व एम .एच .अन्सारी उपस्थित होते.

प्रशिक्षणास तालुक्यातील मराठी माध्यमाचे 70 शिक्षक व इंग्रजी माध्यमाचे 03 शिक्षक उपस्थित होते. प्रशिक्षणास मार्गदर्शक शिक्षक यांनी शिक्षकांना विषया संबंधी ज्या अडचणी होत्या .त्यांना त्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घ्यावा असे सांगण्यात आले.