शिरपूर। शहरात विजय स्तंभ चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांनी शेतकरी आंदोलनास पाठींबा देत सरकारचा निषेध करत मुख्यमंत्राच्या विरोधात घोषणा देत प्रतिकात्त्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन विषयायावर मागील 6 दिवसांपासुन रान माजले असुन शेतकरी आक्रमक झाले आहेत.
फितूर नेते शेतकर्यांचा विश्वासघात करीत असल्याचा आरोप
शेतकर्यांचा मागण्या मान्य होण्यासाठी व्यापक जनसमर्थन त्यांना मिळत आहे. मात्र काही फितुर नेते शेतकर्यांचा विश्वास घात करुन शेतकर्यांची दिशाभुल करत आहेत. त्यांचा देखिल विरोध करत आंदोलन पुढे सतत सुरु राहुन संघर्ष सुरु राहील असे मनोगत व्यक्त करुन आंदोलन करण्यात आले. मात्र सरकार आंदोलनात फुट पाडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थीतीत शेतकर्यांना न्याय मिळावा व न्यायोचित मागण्या मान्य व्हाव्या यासाठी पाठींबा देत शिरपूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकत्यांनी या धोरणाचा जाहिर निषेध व्यक्त केला. शहरातील विजय स्तंभ चौकात राज्य सरकार विरोधी घोषणा देत मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलन व निषेध व्यक्त झाल्यावर पोलीसांनी आंदोलन समाप्त करत पुतळा दहन करुन दिले नाही. याचा देखील निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रसचे पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते. या आंदोलनात तालुका रा.युवक काँग्रेसच्या वतीने उदयराजे जाधव, अध्यक्ष ता.रा.यु.काँ, सूमित पाटील ,रा.कॉ.विद्यार्थी,धिरज सोनवणे,ता.अध्यक्ष,प्रकाश हिरालाल पाटील,उपाध्यक्ष रा.यु.काँ,प्रल्हाद पाटील, कार्याध्यक्ष राहुल मराठे,महेंद्र शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.