शिरपुरात विना परवाना दारु घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात

0

शिरपूर । शहरातील बसस्थानक परीसरात असलेल्या चोपडा जीन जवळ एक 25 वर्षीय युवक विना परवाना दारु विक्रीसाठी घेवुन आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्याने सबंधीत युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत 5 हजार 571 रुपयाची देशी विदेशी दारु जप्त केली ही कारवाई शुक्रवार 16 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आली. शहरातील चोपडा जिनजवळ एक युवक विना परवाना दारु विक्रीसाठी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तेथे जावुन चौकशी केली असता तेथे एकजण संशयीतरीत्या उभा असल्याचे आढळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता प्रथम त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. त्याला पोलिसीखाक्या दाखविल्या नंतर त्याने आपले नाव दयाराम शांतीलाल पावरा रा.खैरखुटी ता.शिरपूर असल्याचे सांगितले. पावरा यांच्याकडून टँगो पंच या देशी दारुच्या 2 हजार 496 रुपये किमतीच्या 48 बाटल्या, मास्टर ब्रँडही विदेशी दारुच्या 1 हजार 875 रुपये किंमतीच्या 15 बाटल्या व 1 हजार 200 किमतीच्या व्हिक्सीच्या 10 बाटल्या अशी 5 हजार 571 रुपये किमतीची देशी विदेशी दारु जप्त करण्यात आली.