शिरपूरच्या आर.सी.पटेल महाविद्यालयात पर्यावरण पोस्टर सादरीकरण स्पर्धा

0

शिरपूर । येथील आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित आय.एम. आर .डी. शिरपूर परिसंस्थेत प्रथमवर्ष पदवीतीलबी.बी.एम., बी.सी.ए., बी.बी.ए.च्याविद्यार्थ्यांकरीता पर्यावरणविषयअंतर्गत पोस्टर सादरीकरणाचीसृजन -2017 स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आले होते. यास्पर्धेचे उद्घाटन आय.एम.आर.डी. परीसंस्थेचे उपसंचालक प्रा.मनोज बेहेरे यांच्याहस्ते करण्यात आले. सृजन-2017 स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी आम्ल,पर्जन्य, पाणी अडवा पाणी जिरवा, जागतिक तापमान वाढ, पूर्णविकरणीय संसाधने, प्रदूषण इ. विविध सामाजिक आणि पर्यावरणपूरक विषयांचे पोस्टर सादरीकरण केले. विजेत्या स्पर्धकांना सुवर्ण पदकदेऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

बीबीएमच्या 60 विद्यार्थ्यांचा सहभाग
बी.बी.एम. प्रथमवर्षातील रुचिता पवार, तेजस्वीनी फुलारी व प्रतिक्षा सोलंकी यांनी नैसर्गिक संसाधने याविषयावरील पोस्टर सादरीकरण करुन प्रथम क्रमांक पटकावला. तसेच श्रृती जैन, किरण महाजन व प्राची पाटील यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. दर्शन छाजेड , नरेश पटेल, अक्षय मराठे व पप्पू जावरे यांनी तृतीयस्थान मिळवले. बी.बी.एम. प्रथमवर्षातील एकूण 60 विद्यार्थ्यांनी 20 गटातून स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.बी.बी.ए. प्रथमवर्षांत प्रथम क्रमांक मेघा शर्मा, अमोल सोनवणे व कुणाल गिरासे यांच्या गटाने प्राप्त केले. कोमल लोहार, किर्ती धाकडव दिपाली शिंपी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. पुजा चौधरी, उज्वला चौधरी व तारकेश्वरी पाटील यांनी तृतीयस्थान मिळवले. तर बीसीए प्रथमवर्षांतून स्नेहल जोशी, प्रिया पाटीलव पल्लवी राजपूत यांनी यश प्राप्त केले. तसेच राजश्री पाटील, प्राजक्ता चौधरी,वैष्णवी पटेल व मिनल पाटील यांनी द्वितीयस्थान मिळवले. आदिती ठाकरे, शिवानी चौधरी, दिपाली भंगाळेव महिमा राजपूत यांनी तृतीयस्थान प्राप्त केले.

यांनी पाहिले कामकाज
परीक्षक म्हणून मनिषा चौरे, प्रा.प्रियंका भंडारी, रक्षा सुशीर यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी प्रा.तुषार पटेल, प्रा.अमर गौर, प्रा.योगेश शेटीया, प्रा.सचिन सुराणा, प्रा.शुभांगी पिंगळे, प्रा.अमुल तांबोळी यांनी कामकाज पाहिले. यशस्वीतांचेे कौतुक माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, राजगोपाल भंडारी, प्रभाकरराव चव्हाण, डॉ. वैशाली पाटील, एम.सी.ए. विभागप्रमुख प्रा.मनोज बेहेरे, एम.बी.एम. विभाग़प्रमुख प्रा.मनोज पटेल, पदवीविभागप्रमुख प्रा.तुषार पटेल यांनी केले.