शिरपूरच्या लाचखोर हवालदाराराची कोठडीत रवानगी

दिड लाखांची लाच मागणी भोवली : नाशिकच्या एसीबीच्या पथकाने केली अटक

शिरपूर : शिरपूर शहर पोलिस ठाण्यात 46 वर्षीय तक्रारदाराविरुद्ध तक्रार अर्ज दाखल असून त्यावरून चौकशी करून त्यात मदत करीत गुन्हा दाखल न करण्यासाठी शिरपूर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार उमेश गुलाबराव पाटील यांनी फेब्रुवारी महिन्यात तब्बल दिड लाखांची लाच मागितली होती मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केल्यानंतर 4 फेब्रुवारी लाचेची पडताळणी करण्यात आली मात्र आरोपी हवालदाराने लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागितल्याचा अहवाल एसीबीला प्राप्त झाल्यानंतर नाशिकच्या पथकाने मंगळवारी रात्री शिरपूर पोलिस ठाण्यात आरोपी हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. दरम्यान, आरोपीला बुधवारी धुळे एसीबीच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर धुळे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. एसीबीच्या कारवाईने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली.

यांनी केली हवालदाराला अटक
आरोपी हवालदार नाशिक एसीबीचे निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, पोलिस निरीक्षक मृदुला, हवालदार दीपक कुशारे, हवालदार सचिन गोसावी, हवालदार मोरे, नाईक एकनाथ बाविस्कर, अजय गरुड, चालक नाईक शिंपी आदींनी अटक केली.

आरोपीला एक दिवसाची कोठडी
आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर त्यास धुळे एसीबीच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर बुधवारी धुळे न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुर्‍हाडे करीत आहेत.