शिरपूर: शहरात लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू, किराणा दुकान, दूध, भाजीपाला व फळे विक्री करण्याकरीता सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंतचा कालावधी निश्चित केलेला आहे. या कालावधी व्यतिरिक्त आदेशाचा भंग करणार्या आस्थापना सुरु ठेवणार्या 9 दुकानदारांवर शिरपूर नगरपरिषद आणि शिरपूर तहसील कार्यालय यांनी संयुक्तरित्या सोमवारी, 27 एप्रिल रोजी कारवाई केली आहे.
कारवाईत साकरीया उपहार गृह, ए.जी.गुप्ता किराणा, महाविर स्वीट अॅण्ड जनरल स्टोअर्स, साईकृपा प्रोव्हिजन, साई ग्रो सर्व्हिसेस, आर.के. सम्राट, खुशी किराणा, वशिम शेख करीम, संजय कुमार सुमतीलाल जैन अशा आठ दुकानदारांचा समावेश आहे. नागरिक व व्यवसायिकांना लॉकडाऊनच्या काळात सुरक्षित अंतराचे पालन करणे, मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही काही जणांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे मुख्याधिकार्यांनी सांगितले.
कारवाईसाठी तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्यासह दीपक मराठे, भरत ईशी, भटू माळी, कैलास सजन पाटील, संजय बारी उपस्थित होते. कोरोना संकट टाळण्याकरीता नागरिकांनी शहरातील होम डिलेव्हरी योजनेचा लाभ घ्यावा. घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले आहे.
Next Post