शिरपूर । प्रतिनिधी । शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील चोपडा फाट्यालगात असलेल्या उड्डाणपुलावर आज दि.२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास एका इंडिया कारने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली.
याबाबत माहिती अशी की, सकाळी साडेअकराच्या सुमारास दहीवदकडून शिरपूरे कडे सुभाष जामा पावरा हे आपल्या कुटुंबियांसह इंडिका कारमधून जात होते. चोपडा फाट्याजवळ त्यांच्या गाडीतून अचानक धुर निघू लागल्याने त्यांनी गाडी थांबवत तातडीने बाहेर पडले. काही क्षणांमध्येच गाडीने पेट घेतला. राज्य महामार्ग पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. तर शिरपूर न.पा.च्या अग्नीशामक दलाकडून ही आग विझविण्यात आली. दरम्यान, महामार्गावर यामुळे काही काळ वाहतूकीचा खोळंबा झाला.