शिरपूर:तालुक्यातील तीन पॉझिटिव्ह रुग्णानी यशस्वी उपचारानंतर कोरोनावर मात करत घरी परत आल्याने तालुक्याला दिलासादायक बातमी मिळाली आहे. तालुक्यातील अर्थे येथील दोन व शहरातील भूपेश नगर येथील रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी आले आहेत.
शिरपूर तालुक्यात अचानक कोरोनाच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. अर्थे येथील जवानाचा अहवाल धुळे येथे असतांना पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर जवानाची पत्नी व लहान मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. नंतर जवानाच्या अर्थे येथे राहणाऱ्या आई आणि वडीलांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला होता. आता मात्र त्या जवानाचे अर्थे येथे राहणारे आई–वडील कोरोना मुक्त होऊन परतले. त्यामुळे अर्थे गाव आता सध्या परिस्थितीत कोरोना मुक्त झाले आहे. तर दुसरीकडे शहरातील भुपेश नगर भागात एसटी चालकाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह प्राप्त झाला होता. मात्र, त्या रुग्णाचा उपचारानंतर अहवाल निगेटिव्ह आला आहे.त्यामुळे आज भुपेशनगर येथील रुग्ण कोरोनावर मात करत कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.यावेळी भुपेश नगर परिसरातील उपस्थितांनी त्यांंचे पुष्पहार देऊन औक्षणाने कौतुकात टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
सहा जणांची कोरोनावर मात
तालुक्यात याआधी आमोदे येथील तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले. तालुक्यातुन सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने तालुक्याला तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे.