शिरपूर तालुक्यात ट्रक व टाटा 407 वाहनात अपघात : दोघे ठार

शिरपूर : कापसाचे बियाणे नेणार्‍या टाटा 407 वाहनासह ट्रकमध्ये अपघात होवून अकोल्यातील दोन जागीच ठार झाले. हा अपघात शिरपूर तालुक्याजवळ शनिवारी दुपारी घडला. अब्दुल सगीर शेख जामीर (20) व अब्दुल फारुक गुलाम मतीम (बाळापूर, जि.अकोला) अशी मयतांची नावे आहेत.

ट्रक चालक पसार
अकोला येथून शिरपूरकडे कापसाचे बियाणे वितरीत करून चोपडा कडे जाणारे टाटा वाहन (एम.एच.43 एफ 0842) ट्रक (आर.जे.40 जी.ए.एफ. 4822) यांच्या अपघात घडल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. अपघातानंतर अज्ञात ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला.