शिरपूर । तालुक्यातील 19 गावांसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या प्रयत्नाने दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत 95.50 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून त्यांनी केलेल्या अंमलबजावणी बद्दल कौतुक केले जात आहे. माजी शिक्षणमंत्री आ. अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, स्वीय सहाय्यक अशोक कलाल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्यातील गावांसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद समाज कल्याण खात्याकडून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत विविध कामांसाठी 95.50 लाख रुपयांचा आर्थिक निधी मंजुर करण्यात आला. यासाठी महिला व बालकल्याण सभापती वंदना गुजर यांनीही सहकार्य केले.
असा आहे निधी
वासर्डी येथील दलित वस्तीमध्ये समाज मंदिर बांधकामासाठी 7 लाख रुपये, सावळदे येथे दलित वस्तीमध्ये समाज मंदिरासाठी 7 लाख रुपये, मोहिदा येथे दलित वस्तीमध्ये रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी 2 लाख रुपये, होळ येथे दलित वस्तीमध्ये समाज मंदिर बांधकामासाठी 7 लाख रुपये, करवंद येथे दलित वस्तीमध्ये हायमास्ट दिवे लावण्यासाठी 4 लाख रुपये, विखरण येथे अनु. जाती वस्तीमध्ये रस्ता काँक्रीटीकरणासाठी 5 लाख रुपये, रुदावली अनु. जाती वस्तीमध्ये रस्ता काँक्रीटीकरण 5 लाख रुपये, होळ येथे अनु. जाती वस्तीमध्ये रस्ता काँक्रीटीकरण 5 लाख, अर्थे बु. येथे अनु. जाती वस्तीमध्ये रस्ता काँक्रीटीकरण 12 लाख रुपये, वाघाडी येथे रोहिदास नगर वस्तीत समाज मंदिर बांधकाम 5.50 लाख रुपये, भोरखेडा येथे अनु. जाती वस्तीमध्ये समाज मंदिर बांधकाम 7 लाख रुपये, थाळनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर मध्ये सार्वजनिक शौचालय बांधकाम 5 लाख रुपये, थाळनेर येथे कांदवाडा दलित वस्तीत सार्वजनिक शौचालय बांधकाम 5 लाख रुपये, अजंदे खु. येथे दलित वस्तीत काँक्रीट गटार बांधकाम 2 लाख रुपये, करवंद येथे दलित वस्तीत हायमास्ट लॅम्प बसविणे 1 लाख रुपये, मांडळ येथे दलित वस्तीत काँक्रीट गटार बांधकाम 3 लाख रुपये, वरुळ येथे काँक्रीट रस्ता काँक्रीट गटार बांधकाम 5 लाख रुपये, अजनाड बंगला येथे काँक्रीट रस्ता व गटार बांधकाम 3 लाख रुपये, वाघाडी येथे काँक्रीट रस्ता व गटार बांधकाम 5 लाख रुपये असे एकूण 95.50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून प्रत्यक्ष कामांना सुरुवात देखील झाली आहे. याबद्दल सर्व गावांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, ग्रामस्थ यांनी आनंद व्यक्त केला.