शिरपूर नगरपरिषदेत महिला कर्मचार्‍यांचा सत्कार

0

शिरपूर । शिरपूर वरवाडे नगर परिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिवस साजरा करण्यात येवून महिला कर्मचारी व स्वच्छता महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न.पा. आरोग्य सभापती नाजेराबी शेख होत्या. या कार्यक्रमास शिरपूर वरवाडे नगरपरिषदेतील सर्वपक्षीय नगरसेविका व महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास मुख्याधिकारी अमोल बागुल, शिक्षण सभापती हेमलता गवळी, अ‍ॅड. शालिनी सोनवणे, डॉ. जयश्री निकम, नगरसेविका संगीता देवरे, नगरसेविका छाया ईशी, नगरसेविका मुमताजबी कुरेशी, नगरसेविका सुलोचना साळुंके, नगरसेविका वैशाली देवरे, नगरसेविका रेखा सोनार, नगरसेविका मोनिका शेटे, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, पौर्णिमा पाठक, दिपाली साळुंके तसेच महिला पदाधिकारी, नगरसेविका, महिला कर्मचारी उपस्थित होते. न.पा. मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी मार्गदर्शन केले. अ‍ॅड. शालिनी सोनवणे व डॉ. जयश्री निकम यांनी आपले अनमोल विचार स्पष्ट केले. नगर परिषदेत काम करणार्‍या सर्व कर्मचारी महिलांचा उपस्थित नगरसेविकांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. दिपाली साळुंके यांनी सुत्रसंचालन तर प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी यांनी आभार मानले.