शिरपूर । धुलीवंदनासाठी पाण्याची गाडी दिली नाही या कारणावरून नगरपालिकेच्या कार्यालयात घुसून तिघांनी तोडफोड केल्याची घटना सोमवार 13 रोजी दुपारी घडली. या प्रकरणी सुनिल वासुदेव चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर पोलीस स्टेशनला अज्ञात तोडफोड करणार्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंगपंचमीसाठी पाण्याच्या गाडीची मागणी करण्यासाठी काही तरूण नगरपालिकेत दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास आले होते. पालिका कर्मचारी सुनिल चव्हाण यांनी मनाई केली होती. त्याचा राग येवून तिघ तरूणांनी पालिकेतील कार्यालयांमधील खुर्च्या फेकून तोडफोड केली. दरम्यान त्या तिंघा विरूद्ध चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे.कॉ.पाटील करीत आहेत.