शिरपूर पीपल्स बँकेच्या माध्यमातून सभासद व ग्राहकांना अद्ययावत जलद सेवा
चेअरमन योगेश भंडारी यांचे प्रतिपादन
शिरपूर । शिरपूर पिपल्स बँकेच्या माध्यमातून सभासद, सर्वसामान्य नागरीक व ग्राहकांना अद्ययावत, जलद व चांगली सेवा देण्यात येत असून बँक प्रगतीपथावर आहे. योग्य रीतीने कर्ज सुविधा तात्काळ देण्याबाबतही संचालक मंडळ सकारात्मकतेने काम करीत आहेत. यावर्षीही सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करीत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासून सभासदांना अनेक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी बँकेमार्फत भरघोस आर्थिक सहायता केली जाते, असे प्रतिपादन शिरपूर पिपल्स बँकेचे चेअरमन योगेश भंडारी यांनी केले. शिरपूर पिपल्स बँकेचे सर्वसाधारण सभा रविवार १७ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता आर.सी.पटेल इंजिनिअरींग कॉलेजच्या लायब्ररी हॉलमध्ये प्रियदर्शिनी नागरी सहकारी पतपेढीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, शिरपूर पिपल्स्बँकेचे माजी चेअरमन तथा तज्ज्ञ संचालक राजगोपाल भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच विद्यमान चेअरमन योगेश भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावर्षीही सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर
बँकेला गेल्या आर्थिक वर्षात ६ कोटी १० लाख रूपयांचा नफा झाला असून बँकेचे कामकाज अतिशय सुरळीतपणे सुरु आहे. नोटाबंदीच्या अडचणीच्या काळात बँकेमार्फत ग्राहकांना अतिशय चांगली सेवा देण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. प्रधानमंत्री जीवनज्योती व प्रधानमंत्री सुरक्षा योजनेंतग ८ खातेधारकांच्या कुटुंबियांना १६ लाख रुपयांची विमा रक्कम मिळवून दिली आहे. दरवर्षा प्रमाणे गेल्या आर्थिक वर्षात रुग्ण सभासदांसाठी मोठया प्रमाणात आर्थिक सहकार्य केले आहे. उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, तज्ज्ञ संचालक राजगोपाल भंडारी, चेअरमन योगेश भंडारी, व्हा.चेअरमन श्रेणिक जैन यांनी मार्गदर्शन केले. २० रुग्णांना अँजिओग्राफी व हृदय शस्त्रक्रियेसाठी एकूण ७ लाख १० हजार रूपये, १३ जणांना मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी १७ हजार, कन्यारत्न प्राप्त झालेल्या ४ सभासदांना एकूण २० हजार, किडनी प्रत्यारोपण १० हजार, २८ मयत सभासदांच्या वारसांना २ लाख ४२ हजार ५०० रु., २२४ गुणवंत विद्यार्थ्यांना एकूण २ लाख ३२ हजार २०० रूपयांचे बक्षिस, अमरधाममध्ये लाकूड पुरवठेसाठी २.६७ लाख रूपये असा एकूण १५ लाख २८ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. बँकेच्या सर्व कामांमध्ये आमदार अमरिशभाई पटेल, राजगोपाल भंडारी यांचे मार्गदर्शन लाभल्याचे योगेश भंडारी यांनी सांगितले
यांची होती उपस्थिती
सी.बी.अग्रवाल, कलासचंद्र अग्रवाल, मोतीलाल माळी, विजय राठी, श्रीकेश राठी, मर्चंट बँक चेअरमन प्रसन्न जैन, आर.एस.गुजराथी, बाबुलाल माळी, कमलकिशोर भंडारी, दिलीप पटेल, प्राचार्य डॉ. संजय सुराणा, नंदकुमार ठाकरे, विनय भंडारी, संजय चौधरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, कल्पनाताई राजपूत, जितेंद्र पोतदार, भुपेश अग्रवाल, प्रल्हाद पावरा, सीईओ बी.जे. पाटील आदी उपस्थित होते.