शिरपूर पोलिस स्टेशनला स्वाभिमानचे निवेदन

0

शिरपूर । शहरातील स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय बाफना व उपाध्यक्ष एस.कुमार माळी यांनी नुकतेच शिरपूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक संजय सानप यांना हरातील वाढत्या चोर्‍या रोखण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी आर्थिक मदत करणार असल्याचे निवेदनात सांगितले आहे. निवेदनात म्हटले आहे की जिकडे तिकडे चोर्‍यांचे प्रमाण वाढत आहे. याकारणाने शहरात अशा गोष्टीना आळा बसावा म्हणून सी.सी.सी. टिव्ही बसविण्यात यावा याकामी स्वाभिमान प्रतिष्ठाना मार्फत अर्थिक मदत देण्याचे येईल असे आश्वासन प्रतिष्ठाना चे अध्यक्ष विजयभाऊ बाफना यांनी दिले. यावेळी पोलिस निरीक्षक संजय सानप , तसेच पाटील साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी स्वाभिमान प्रतिष्ठानचे विजय बाफना, एस. कुमार माळी, एम.के.भामरे, मोतिलाल शर्मा, मनोज संकलेचा, संजय कुंभार, मोहसिन बोहरी व गणेश जैन आदी उपस्थित होते